एक लाकूडतोडया रानातले एक मोठे झाड कुऱ्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास फार वेदना होऊ लागल्या. तेव्हा ते झाड आपल्याशीच म्हाणाले, ‘काय माझी वाईट स्थिती झाली ही! ज्या कुऱ्हाडीने हा मनुष्य मला तोडत आहे तिचा किंवा या मनुष्याचा यात काही मोठासा दोष आहे असे नाही, परंतु माझ्याच शरिरापासून काढलेल्या या कुऱ्हाडीच्या दांडयाने मला तोडण्यास या कुऱ्हाडीस मदत करावी, हे पाहून मला फार वाईट वाटते.’
तात्पर्य:- मनुष्यावर संकट येणे हे तर वाईटच, परंतु ते संकट त्याच मनुष्याच्या आप्तांनी त्याजवर आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट दुसरी नाही.